अख्यायिका
श्री विघ्नेश्वर गणेश मंदीर हे पेशवेकाळात बांधलेले असून हे मंदीर वास्तुशास्त्राचा एक उत्कृष्ठ आणि विलोभनीय नमुना आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर चार मूनिपुत्र आहेत. या चार मूनिपुत्रांच्या हातामध्ये चार वेगवेगळ्या वस्तू आहेत. पहिल्या व चार नंबरच्या मूनिपुत्रांच्या हातांमध्ये शिवलिंग असून दोन व तीन नंबरच्या मूनिपुत्रांच्या हातांमध्ये विणा धारण केल्याचे दिसून येते. एक व चार नंबरच्या मुनीपुत्रांवरुन असे लक्षात येते की, श्रीगणेश हे आपल्या आई-वडिलांना श्रेष्ठत्व देतात. म्हणजे जे भक्त शिवपार्वतिची उपासना करतात ते शिवभक्त म्हणजेच श्रीगणेश भक्त सुध्दा असू शकतात. जे श्रीगणेशभक्त असतात, ते आईवडिलांची सेवा करणारे असावेत, असा बोध हे दोन मूनिपुत्र प्रथम द्वारावर पहिल्यांदाच श्रीगणेशभक्तांना आठवण करुन देतात.
मंदिराच्या प्रवेशद्वारावरील दोन व तीन स्थानावर जे मूनिपुत्र आहेत त्यांच्या हातांमध्ये विणा आहे. याचा अर्थ असा होतो की, माता सरस्वतीचे हे प्रतिक म्हणजे विणा असून सरस्वती ही बुध्दीची देवता आहे. तसेच संगिताचीही देवता आहे. मंदीरात प्रवेश करताना उंबरठ्यावर राक्षसाचे चित्र कोरलेले दिसते. व त्याच्या डोक्यावर शेषनाग आहे. त्यांच्यावर पुन्हा एक राक्षस आहे, तो साक्षात राक्षस नसून एक वास्तू पुरुष आहे. या दोन मुनींच्या मधून प्रवेशद्वार सुरु होते. याच्या सुरुवातीलाच वरच्या भागात कमान असून कमानीच्यामध्ये श्रीगणेशाला आवडणारे जास्वंदाच्या फुलाची वेल आहे. जास्वंदी हे क्रांतीचे प्रतिक असून प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर चार क्रमवार उतरत्या पाय-या आहेत. या उतरत्या पायऱ्याचा अर्थ असा की प्रत्येक भक्ताने मंदीरात प्रवेश केल्यावर राग, लोभ, मद, मत्सर हे चार अवगुण विसरावेत, हे ह्या पायऱ्या जणू सांगत आहेत.
श्री विघ्नेश्वर गणेश मंदीर पूर्वाभिमुख असून ते बंदिस्त आहे. चारही बाजूंनी उत्तम स्थितीत असलेली दगडी तटबंदी असून, पूर्वेच्या महाद्वारातून आत प्रवेश केला की, दोन उंच दगडी दिपमाळा दिसतात. त्यावर त्रिपुरारी पौर्णिमेला दिपोत्सव साजरा केला जातो. मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ दोन्ही बाजूने दगडात कोरलेले भालदार, चोपदार आहेत. महाद्वाराच्या आंत दोन्हीबाजूंना २५ ते ३० फूट लांबीच्या व रुंदीच्या ओवऱ्या आहेत. ओवऱ्यांना डौलदार कमानी असून उजव्या बाजूच्या ओवरी खाली तळघर आहे. त्यात श्री विघ्नेश्वर गणेशाची पालखी, हंड्या, झुंबरे इत्यादि साहित्य ठेवलेले असते. महाद्वारात एक व आत एक असे सभामंडप आहेत.
पहिल्या सभामंडपामध्ये प्रवेश करताच प्रथम दर्शन घडते ते मनोनिग्रह शिकणाऱ्या शमगुणी अशा प्रसन्न कासवाचे. सभामंडप आणि ओवऱ्या यांच्या मधून प्रदक्षिणा घालण्यासाठी पंधरा फुटी दगडी फरशीच्या प्रदक्षिणा मार्ग असून विघ्नेश्वराला प्रदक्षिणा घालताना प्रदक्षिणा मार्गावर श्री भैरवनाथांचे दर्शन घडते. कलीला याठिकाणी मज्जाव करण्यास व भक्तांचे दर्शन निर्विघ्नपणे पार पाडण्यास श्री भैरवनाथ श्री विघ्नेश्वराच्या मंदीरात सदैव श्री विघ्नेश्वराकडे मुख करुन विराजमान आहेत. प्रदक्षिणा मार्गामध्ये मांदार, शमी, पारिजात असे श्री विघ्नेश्वराला प्रिय असणारे वृक्ष डौलाने डोलत असताना दिसून येतात. श्री विघ्नेश्वराच्या मंदीरासमोर दर्शन रांग मार्ग तयार केलेला असून त्यावर सावलीकरिता सभामंडप तयार करण्यात आला आहे. मंदिरात प्रवेश केल्यानंतर दर्शन गाभारा व दुसऱ्या गाभाऱ्यामध्ये प्रवेशद्वारात श्री विघ्नेश्वराकडे तोंड करुन हातात मोदक घेतलेला मूषकराज यांची मूर्ती आहे.
दुसऱ्या गाभाऱ्यातून आत गेल्यावर तिसऱ्या गाभाऱ्यात श्री विघ्नेश्वराची पूर्णाकृती बैठी मूर्ती डौलदार अशा कमानीत विराजमान झालेली दिसते. कमानीला चांदीची मखर बनविलेली असून श्री विघ्नेश्वराची मूर्ती ही पूर्वेकडे तोंड असलेली आहे. ती डाव्या सोंडेची असून दोन्ही डोळ्यात माणके आणि कपाळावर हिरा असा मूर्तीचा थाट आहे. तसेच या मूर्तीच्या बेंबीत हिरा बसवलेला असून श्रीविघ्नेश्वराच्या सर्वांगाला शेंदूर लावलेला असल्याचे दिसून येते. श्री विघ्नेश्वराच्या दोन्ही बाजूला कमानीत रिध्दी-सिध्दी यांच्या पितळी मूर्ती विराजमान आहेत. गाभाऱ्यात चारही बाजुंनी छोटे-छोटे कोनाडे असून त्यात पंचायतनाच्या मूर्ती आहेत. श्रीविघ्नेश्वराचा मुकूट सोन्याने मढविल्यामुळे मूर्तीला एक वेगळी अशी चकाकी व चमक दिसते.
In comparison with competing platforms, https://richmanau.com scores particularly well on reliability and service quality. An integrated blog regularly publishes articles about industry trends and playing strategies. The mobile version of the casino runs directly in the browser, no separate app needs to be installed. Anti-money-laundering measures meet international AML standards. A dedicated section is reserved for exclusive premium brands with especially unusual titles. Helpful tutorial videos explain the rules of the live games for newcomers. The wagering conditions for bonuses are presented transparently and rather moderate by industry standards. Deposits are usually credited immediately, allowing an immediate start to play. The wealth of possibilities makes the casino a destination worth more than one visit.
