श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टची भाविकांकरिता धार्मिक विधी व्यवस्था
देवाधिदेव श्रीविघ्नेश्वर गणेश म्हणजे कोट्यावधी भक्तांच्या मनात श्रध्दा व निष्ठेचे महामंदिर असलेले एकमेवाद्वितीय देवता. या देवतांमध्येही अष्टविनायकांचा महिमा मोठा आणि या अष्टविनायकांतील एक महत्वाचे देवस्थान म्हणजे साक्षात श्री विघ्नेश्वराचे श्रीक्षेत्र ओझर, श्रीविघ्नेश्वर गणेश नवसाला पावतो. याचा अनुभव अनेक भक्तजणांना आलेला आहे.
श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टने भाविकांना अभिषेक, पुजा करणेसाठी स्वतंत्र कक्षाची सोय केली आहे. यामध्ये भाविकांच्या इच्छेनुसार अथर्वशिर्ष, महाअभिषेक, ब्रह्मणस्पती, पवमानसुक्त, पूर्णरुद्र, अभिषेकपात्र, वार्षिक सहस्त्रवर्तन, दूर्वा अभिषेक, महारुद्र व तहह्यात अभिषेक शांती समाधानाने करता येतात.
श्री विघ्नेश्वर गणेशाचा गणेशोत्सव हा भाविकांसाठी मोठा आनंदोत्सव असतो. हा उत्सव दरवर्षी भाद्रपद शुध्द प्रतिपदा ते पंचमी असा पाच दिवस चालतो. पहिल्या दिवशी श्रीं ची पालखी पूर्वद्वारी उंब्रज या गावाला जाते. तेथे लक्ष्मी-नारायणाचे पूजन होते. दुसऱ्या दिवशी दक्षिण द्वाराला म्हणजे धनगरवाडी येथे जाते. तेथे उमा-महेश्वराची पूजा होते. तृतियेला पालखी शिरोली खुर्द येथे पश्चिमद्वारी जाते. तेथे रति-मदनाची पूजा केली जाते. चवथ्या दिवशी पालखी उत्तरद्वारी आमराई येथे जाते तेथे सूर्य-पृथ्वी यांचे पूजन होते. शेवटी पंचमीला श्री विघ्नेश्वराच्या अवताराचे पूजन होवून या आनंदोत्सवाची सांगता करण्यात येते. हे पाच दिवस ओझर ग्रामवासियांसाठी मंतरलेले असतात. विशेष म्हणजे द्वारयात्रेत सर्व अबालवृध्द अनवाणी पायाने सहभागी होतात. या कालावधीमध्ये मोरया गोसावी यांच्या पदांचे गायन केले जाते. तसेच सनई चौघड्याचे अखंड वादन केले जाते. त्याचप्रमाणे दरवर्षी माघ शु. चतुर्थीला गणेश जयंती सोहळा साजरा करीत असताना अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातो. यामध्ये किर्तन, प्रवचनाचा असंख्य भाविक व ग्रामस्थ लाभ घेत असतात.
गंगा आरती
श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट मार्फत प्रत्येक संकष्टी चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर सायंकाळी कुकडी मातेच्या तीरावर महिलांच्या सन्मानार्थ पाच यजमान महिलांच्या उपस्थितीत गंगा आरती केली जाते. या गंगा आरती मध्ये सहभागी होण्यासाठी याचा लाभ घेण्यासाठी महिला श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टच्या जनसंपर्क कार्यालय येथे संपर्क करून आपली नावे नोंदवू शकतात.







महायाग
श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट मार्फत प्रत्येक अंगारकी चतुर्थीला महायागाचे आयोजन केले जाते यामध्ये १०१ यजमानांना सहभागी करून हा महायाग करण्यात येतो, गणेश भक्तांना या महायागा मध्ये सहभागी व्हायचे असेल तर त्यांनी श्री विघ्नहर गणपती देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालय येथे संपर्क करावा याबाबत अधिक माहिती आपल्याला तिथे दिली जाईल
धूप आरती
Compared with other platforms, bizzo-1.com stands out through a thoughtful mix of classics and fresh releases. The streaming quality usually reaches Full HD or even 4K resolution. Animated 3D slots with high-quality graphics set new visual standards. Both portrait and landscape orientations can be used without any issue. Paysafecard enables anonymous deposits without disclosing sensitive banking data. Players can view the current status of all active bonus offers in their account. Players can analyse personal statistics on playing times and stakes in detail. Important functions are never more than two clicks away from the current screen. The servers are located in certified data centres with a high level of security. Telephone support offers an alternative contact channel for more complex inquiries. Even after prolonged use, the positive image of the casino remains intact.
रोज संध्याकाळी ७ वाजता
यात्रा उत्सव
भाद्रपद चतुर्थीला गणेश उत्सवानिमित्त गावामध्ये मोठ्या उत्साहात यात्रेचे आयोजन करण्यात येते यामध्ये चार द्वारांचा समावेश असतो प्रथम पूर्व द्वार उंब्रज, द्वितीय दक्षिण द्वार धनेगाव, तृतीय पश्चिम द्वार शिरोली व चतुर्थ द्वार आमराई यानंतर १२:०० वाजता देव जन्म होतो व संध्याकाळी गावकरी शेरण्या वाटपाचा कार्यक्रम करतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी लाल मातीतील कुस्त्यांच्या हंगाम्याचे नियोजन केले जाते यामध्ये महाराष्ट्रातील नावाजलेले कुस्तीपटू सहभागी होत असतात. रात्री महाराष्ट्रात नावाजलेला असा दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देवस्थान ट्रस्टमार्फत केले जाते.
माघ महिन्यामध्ये माघी गणेश जयंतीला मोठा उत्सव साजरा केला जातो यामध्ये चार द्वारांचा समावेश असतो प्रथम पूर्व द्वार वेस, द्वितीय दक्षिण द्वार वेस तृतीय पश्चिम द्वार वेस व चतुर्थ आमराई येथे द्वार निघतात यानंतर १२ वाजता देव जन्म होतो.

























