भाविकांच्या सेवेत ॲम्बुलन्स सुविधा
श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टमार्फत अत्यावश्यक सुविधेमध्ये भाविकांसाठी साधी ॲम्बुलन्स व कार्डियाक ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध केलेली आहे.

महाप्रसाद
श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट मार्फत प्रशस्त असे अत्याधुनिक भोजनालय अन्नछत्र चालवले जाते, भोजन करण्यासाठी यामध्ये सुसज्ज अशी आसन व्यवस्था केलेली आहे.
भोजनालयाची वेळ : सकाळी १०. ३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत व संध्याकाळी ७. ३० ते रात्री १०. ३० वाजेपर्यंत.
श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट मार्फत २१ हजार रुपये देऊन अन्नदान योजना देखील चालवली जाते.. यामध्ये आपली जन्मतारीख, आपल्या जवळच्या परिवारातील व्यक्तीची जन्म तारीख, कुणाची पुण्यतिथी अश्या विशिष्ट दिवशी २१ हजार रुपये अन्नदान देणगी देऊन पुढील १० वर्षांसाठी त्या विशिष्ट दिवशी आपल्या तर्फे अन्नदान केले जाते, म्हणजे महिन्याला रुपये २१००/-.
अन्नदानाचा फलक देवस्थान ट्रस्टच्या स्वागत कक्षाच्या येथे लावला जातो तसेच रोजचे अन्नदाते म्हणून भोजनालयामध्ये एलईडी स्क्रीनवर डिस्प्ले केला जातो.
बायो गॅस प्रकल्प
भोजनालय अन्नछत्र येथील उरलेल्या अन्नाचे बायोगॅस मध्ये गॅस निर्मिती होऊन त्यानंतर जी स्लरी निर्माण होते त्यातून जीवामृतची निर्मितीचा प्रकल्प श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट राबवत आहे.
हे जीवामृत झाडांसाठी टॉनिकचे/खताचे काम करते, जीवामृत ची विक्री स्वागत कक्ष व जनसंपर्क कार्यालय येथे केली जाते.
भोजनालय/अन्नछत्र येथे उरलेल्या अन्न फेकून न देता त्यासाठी देवस्थान ट्रस्टने बायोगॅस प्रकल्पाची निर्मिती केलेली आहे यातून गॅस निर्माण करून तो भोजनालय/अन्नछत्र येथील स्वयंपाक गृहामध्ये वापरण्यात येतो.
हॉस्पिटल सेवा
श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट मार्फत मोफत हॉस्पिटल सुविधा व स्वस्त दरात मेडिकल सुविधा राबवली जाते.

इतर उपक्रम
१. श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट मार्फत घरगुती पद्धतीने बनवलेले सुप्रसिद्ध आरती भोग प्रासादिक लाडु बनवले जातात ते देवस्थान ट्रस्टच्या स्वागत कक्ष व जनसंपर्क कार्यालय येथे उपलब्ध असतात.
२. आपण भक्त भाविक श्री विघ्नहर बाप्पा चरणी जे फुल, दुर्वा व हार अर्पण करता त्यापासून श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टने अगरबत्ती व धूप निर्मिती प्रकल्प चालू केला आहे.
अगरबत्ती व धूप स्वागत कक्ष व जनसंपर्क कार्यालय येथे उपलब्ध असतात.
३. श्री विघ्नहर गणपती देवस्थानचे असलेले भक्तनिवास येथील सर्व सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मलनि:सारण प्रकल्पाची निर्मिती केली गेली आहे.
४. श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट मार्फत अत्याधूनिक जनसंपर्क कार्यालयाची निर्मिती केली गेली आहे. तेथे भाविकांना चौकशी करणे तसेच लाडू प्रसाद, अगरबत्ती, धूप व जीवामृत याची विक्री येथे केली जाते
५. भाविक गणेश भक्त देत असलेल्या सर्व देणग्यांचा हिशोब ठेवण्यासाठी श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट मार्फत स्वतंत्र अकाउंट विभागाची निर्मिती करण्यात आली आहे.
६. गणेश भक्तांचे दर्शन रांगेमध्ये ऊन-पाऊस यापासून संरक्षण व्हावे यासाठी मंदिरासमोर श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टने भव्य असा सभामंडप बनविला आहे.